रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील तथा रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नगरधन येथील क्रिकेट जुगार अड्ड्यावर रामटेक पोलिसांनी २९ मे ला धाड टाकली व आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपी नामे मनोज हरिदास कामडी वय ३३ वर्ष रा. वार्ड क्र ०४ नगरधन ता. रामटेक जि.नागपुर यांच्यावर कलम ४.५ महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम १०९ भा.द.वी प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
पो.उप.निरिक्षक श्रीकांत लांजेवार पोलीस स्टेशन रामटेक यांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मे रोजी पो.उप.नि. श्रीकांत लांजेवार सोबत स.पो.नि. अमितकुमार पाण्डेय पो.ना. अमोल इंगोले, पो.ना. प्रफुल रंधई , पो.शि. शरद गिते सह खाजगी वाहनाने पोलीस स्टेशन रामटेक पो स्टे परिसरात पेट्रोलींग करीत असता गुप्तबातमीव्दारे माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत असलेल्या नगरधन येथे राहणारा मनोज कामडी हा त्याच्या घराच्या बाजुला असलेल्या पानठेल्याच्या आत मध्ये सध्या सुरु असलेल्या आय. पी. एल. फायनल च्या चेन्नई सुपर किंग विरुध्द गुजरात टायटन्स यांच्यात सुरु असलेल्या मँचवर पानठेल्यातुन मोबाईल मध्ये पैस्याची बाजी लावुन जुगार खेळत आहे.
दरम्यान ८.५० वाजता नगरधन येथे जावुन मनोज कामडी यांचे पानठेल्याजवळ जावुन पाहणी केली असता त्याचे पानठेल्याच्या आत मध्ये एक इसम मोबाईल घेवुन बसलेला दिसला. दरम्यान पंच व पोलीस स्टॉफ पानठेल्याकडे जात असता पानठेल्याच्या आत मध्ये बसलेला इसम पोलीस व पंचाला येतांना पाहुन पळु लागला होता.
पळतांना तो पडला तेव्हा त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले व त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव मनोज हरिदास कामडी वय ३३ वर्ष रा. वार्ड क्र. ०४- नगरधन ता. रामटेक जि नागपुर असे सांगीतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या हातात एक निळ्या रंगाचा ओपो कंपणीचा अॅन्ड्राईड फोन दिसला सदर मोबाईलचा पासवर्ड खोलून पाहणी केली असता सदर मोबाईल मध्ये सुरु असलेल्या Nice 7777. Pro agent / matches / 642854/ session_bet_slies? user_id=[154475] & session_id=[] या आयडीवर सध्या सुरु असलेल्या आय. पी. एल मॅचवर मनोज कामडी हा जुगार खेळत असल्याची खात्री झाली त्यानंतर आम्ही नमुद इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये 1) नगदी 500/- रुपयाचे एकुण 113 नोटा असे 56500/- रु. व दुकान अडती मध्ये 200/- रु. चे 3 नोटा असे 600/- रु. 100/- रु. च्या 5 नोट असे 500/-रु.10/- रु. च्या 5 नोटा असे 50 रु असे एकुण नगदी 57650/-रु. व 2) एक oppo कंपणीचा अंड्राईड मोबाईल ज्याच्या IMEI 1)866278041553590 2)866278041553582 असा असून कि.5000/- रुपये 3) सॅमसंग 24 इंच टि.व्ही. मॉडेल नंबर La22 ca450e1 कि. 5000/- रु. 4)ucn कंपणीचा सेटप बॉक्स ज्यावर समोर इंग्रजीत D.V.B S2 लिहलेला कि. 1500/- रु. आणी 2 रिमोट एकुण कि. 100/-रु. असा एकुण 69250/- रु. चा माल आरोपी कहन पंचासमक्ष जप्ती पंचनाम्या प्रमाणे जमा करण्यात आले.
तरी यातील आरोपी नामे मनोज हरिदास कामडी वय 33 वर्ष रा. वार्ड के 04 नगरधन ता. रामटेक जि.नागपुर हा त्याचे पान ठेल्याच्या आत मध्ये आय.पी.एल मैचवर त्याच्या ताब्यातील मोबाईलव्दारे लोकांकडुन पैसे घेवुन क्रिकेटवर सट्टा लावण्यासाठी उमेश गावंडे यांच्या कडुन आय डी व पासवर्ड घेवुन ग्राहकांना कमिशनवर देत होता व त्या आय डी वर ग्राहकांनी क्रिकेटवर सट्टा लावुन हरलेले पैसे ग्राहकाकडुन घेवुन उमेश गावंडे यांना देवून कमिशन घेत होता असे दिसुन आले.
तरी सदर आरोपी हा आपले पानठेल्या मध्ये उमेश गावंडे यांच्या मदतीने कमिसनवर क्रिकेट सट्टा चालविताना मिळुन आल्याने त्याचे कृत्य हे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4.5 सह कलम 109 भा.द.वी अन्वये होत असल्याने त्याचे विरुध्द गुन्ह्या नोंद करण्यात आलेला आहे.