Sunday, December 22, 2024
Homeराज्यराहुल गांधी २३ तारखेला परभणी दौऱ्यावर : विशेष विमानाने होणार नांदेड विमातळावर...

राहुल गांधी २३ तारखेला परभणी दौऱ्यावर : विशेष विमानाने होणार नांदेड विमातळावर आगमन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी 23 तारखेला परभणीत येणार असून 23 तारखेला सकाळी 11 वाजता राहुल गांधी दिल्लीहून विशेष विमानाने नांदेडला पोहोचतील. त्यानंतर 1.15 वाजता ते मोटारीने नांदेडहून परभणीला जातील. 2.45 च्या सुमारास राहुल गांधी मयत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतील. यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते सोबत उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते परभणी हिंसाचारात न्यायालयीन कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. त्यांच्यासोबत विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत.

परभणी शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते.त्या घटनेनंतर आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. प्रारंभी सोमनाथ यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता.

पण त्यानंतर पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी परभणीच्या दौऱ्यावर येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेसचे राज्यातील सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.ते पुन्हा 3. 30 वाजता नांदेडकडे प्रयाण करणार असून सांय 5 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन. त्यानंतर 5.15 वाजता नांदेडहुन विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण असा नियोजित दौरा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: