Rahul Gandhi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूतील आपल्या व्यस्त प्रचारातून विश्रांती घेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी रात्री सिंगनाल्लूर येथील एका मिठाईच्या दुकानाला भेट दिली आणि तेथून मिठाईची खरेदी केली. राहुल गांधी त्यांच्या दुकानात पोहोचल्यावर मिठाई दुकानाचे मालक बाबू आश्चर्यचकित झाले.
दुकान मालकाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, राहुल गांधी आल्याने आम्हाला आश्चर्य वाटले. ते बहुधा कोईम्बतूरला मीटिंगसाठी येत होते. त्यांना गुलाब जामुन आवडते, त्यांनी एक किलो मिठाई विकत घेतली. सोबतच इतर मिठाई देखील चाखली. ते आल्याचा मला आनंद झाला, त्यांना पाहून आमचा स्टाफही खुश झाला.
बाबू पुढे म्हणाले की, तो 25-30 मिनिटे येथे थांबले होते. ते इथे येणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही त्यांना पैसे देऊ नका असे सांगितले पण ते त्यांनी मान्य केले नाही. त्याने पूर्ण बिल भरले.
राहुल गांधींनी प्रसिद्ध मिठाई म्हैसूर पाक देखील विकत घेतली, जी त्यांनी डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांना भेट दिली, असे काँग्रेस पक्षाने मायक्रो-ब्लॉगिंग साइट एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
Congress leader Rahul Gandhi stops his cavalcade and visits a sweatshop in TN. He buys Mysore Pak for MK Stalin and interacts with ppl at the sweet shop. pic.twitter.com/UI2e3euxZB
— Anand Singh (@Anand_Journ) April 13, 2024
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, काँग्रेस-डीएमके-नेतृत्वाखालील आघाडीने राज्यातील 39 पैकी 38 जागा जिंकल्या, तर AIADMK फक्त एक जागा जिंकू शकला.