Monday, September 23, 2024
HomeUncategorizedराहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा…प्रकरण जाणून घ्या…

राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा…प्रकरण जाणून घ्या…

कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 2019 मध्ये यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे. मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल राहुल यांच्यावर गुन्हेगारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आजच निर्णय अपेक्षित आहे. हे पाहता राहुल गांधी गुरुवारी सकाळीच सुरतला रवाना झालेत.

राहुल गांधी यांचे आगमन झाले तेव्हा गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर, पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अमित चावडा, एआयसीसी गुजरातचे प्रभारी रघु शर्मा आणि आमदारांसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते सुरतमध्ये उपस्थित आहेत. याआधी, राहुल गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी सांगितले होते की, निकाल सुनावताना काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार आहेत.

राहुल कोणत्या प्रकरणामध्ये झाली शिक्षा?
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. वायनाडचे लोकसभा सदस्य राहुल यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या एका जाहीर सभेत या प्रकरणाशी संबंधित टिप्पणी केली होती.

मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राहुल तीनदा कोर्टात हजर झालेत. ऑक्टोबर 2021 मध्ये, आपले म्हणणे नोंदवण्यासाठी कोर्टात पोहोचलेल्या राहुलने स्वतःला निर्दोष घोषित केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: