Rahul Gandhi : अमेठी-रायबरेली लोकसभा जागेवरून काँग्रेसने सस्पेंस संपवला आहे. राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत, तर केएल शर्मा अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार असतील. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अमेठीतील काँग्रेस उमेदवार केएल शर्मा यांचे पूर्ण नाव किशोरी लाल शर्मा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जातात.
शुक्रवारी म्हणजेच आज अमेठी आणि रायबरेली जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्यादृष्टीने पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अमेठीतून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपने रायबरेलीमधून दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे. दिनेश प्रताप सिंह यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक सोनिया गांधी यांच्या विरोधात लढवली होती. 2019 च्या निवडणुकीत ते सोनिया गांधींकडून 1.6 लाख मतांनी पराभूत झाले.
अमेठी आणि रायबरेली हे गांधी-नेहरू कुटुंबाचे पारंपारिक क्षेत्र मानले जातात, कारण या कुटुंबातील सदस्यांनी अनेक दशकांपासून या जागांचे प्रतिनिधित्व केले आहे. तथापि, 2019 मध्ये राहुल गांधी अमेठीमधून निवडणूक हरले आणि भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी येथे विजयी झाल्या. यावेळी राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे.
2004 ते 2024 या काळात सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यापूर्वी, राजकारणात प्रवेश केल्यानंतर, सोनिया गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि 1999 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली.
20 मे रोजी लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस ३ मे आहे.
Congress leader Rahul Gandhi likely to file nomination from Raebareli & Congress leader KL Sharma likely to contest from Amethi: Sources. #LokasabhaElection2024 pic.twitter.com/NDRbs6iTAi
— ANI (@ANI) May 3, 2024