Thursday, July 18, 2024
spot_img
HomeराजकीयRahul Gandhi | राहुल गांधींनी कुत्र्याला बिस्किट दिले पण...आसामचे मुख्यमंत्री बिस्वा म्हणतात...

Rahul Gandhi | राहुल गांधींनी कुत्र्याला बिस्किट दिले पण…आसामचे मुख्यमंत्री बिस्वा म्हणतात…

Rahul Gandhi : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते गाडीच्या छतावर कुत्र्याला बिस्किटे देताना दिसत आहेत, पण कुत्रा ते खात नाही.

यानंतर ते हे बिस्कीट जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला देतात. आणि तो कुत्रा त्या व्यक्तीच्या हातचे बिस्कीट खाऊ लागतो. यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणतात की, “फक्त राहुल गांधीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मला हे बिस्किट खायला देण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही.”

हा व्हायरल व्हिडिओ पल्लवी नावाच्या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे त्याच ट्विटला उत्तर देताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले, “पल्लवी जी, फक्त राहुल गांधीच नाही तर संपूर्ण कुटुंब मला ते बिस्किट खाऊ घालू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी बिस्कीट खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसमधून राजीनामा दिला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: