Sunday, September 8, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीराहूल देशमुख यांना अटक | काटोल शहर व परिसरातील हजारो नागरिक उतरले...

राहूल देशमुख यांना अटक | काटोल शहर व परिसरातील हजारो नागरिक उतरले सडकेवर…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालय परिसरात च्या सामोर ठिय्या

न्यायालयाने दिला जामीन, पोलिस अधीक्षक /अतिरिक्त पोलिस अधीक्षकांचा काटोल मधे ठिय्या

परिस्थिती नियंत्रणात – राहूल देशमुखांच्या अटकेला राजकिय किनार

नरखेड – अतुल दंढारे

नागपुर जिल्ह्यातील काटोल ही जुनी नगर परिषद आहे. काटोल ‌नगर परिषद अंतर्गत राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरूणी चे ४ में रोजी रेल्वे ट्रॅक वर मृत देह आढला.
मृतक तरूणीचे येथील एका अल्पसंख्याक समाजातील युवकासोबत प्रेम संबाधातू की लव जिहाद प्रकरणातू ही आत्महत्या झाली यावर उलट सुलट चर्चानां उधाणा दरम्यान संबधीतीत तरूणाला काटोल पोलीसांनी अटक केली आहे.

राहूल देशमुख यांना अटक तब्बल वीस दिवस उलटल्यानंतर काटोल चे माजी नगराध्यक्ष व शेतकरी कामगार पक्ष चे नेते राहूल देशमुख यांना २४मे चे पहाटे त्यांचे निवासस्थान वरून काटोल पोलीसांनी अटक केली. ही अटक कां व कशासाठी केली? याचे पोलीसांकडून माहिती मिळण्याचे आधिच राहूल देशमुख यांचे अटकेच्या विरोधात काटोल व्यापार पेठ बंद ठेवण्यात आली तर अटकेची माहिती काटोल नरखेड तालुक्यात वार्यावर सारखी पसरली.

राहूल देशमुख यांचे अटके निषेधार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही राहुल देशमुख यांना काटोल पोलीसाचे दडपशाही अटके विरूद्ध हजारो समर्थकांसह काटोल चे मुख्य मार्गाने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाचे बाजूला न्यायालयपरिसराचे पुढील भागात जामिन मिळे पर्यंत ठिय्या मांडून बसले होते.
या प्रकरणी राहूल देशमुख यांना जामिन ही मिळाला. मात्र अटक कां?हा काटोलात चर्चेचा विषय होता.

या बाबद काटोल पोलीसांची बाजु जानून घेण्यासाठी काटोल पोलीस ‌निरिक्षकांशी संपर्क साधला पण उत्तर मिळाले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण वरिष्ठ अधिकारी मृतकाचे कुटूंबियांची बाजु जानून घेत होते.

राहूल देशमुख यांना काटोल पोलीसांनी केलेल्या अटकेबाबद काटोल पोलिसांची बाजू मिळाली नाही.मात्र या अटके बाबद नागरिकांना मधे जी चर्चा आहे की मृतक उच्च शिक्षित मुलगी आत्महत्या प्रकरणात काटोल मधे काही नागरिकांना येत्या काळात आंदोलन करतील व सामाजिक व जातीय तेढ निर्माण होईल असे पत्रक जे की आज ही प्रत्यक्ष कोणत्याही काटोलकराकडे नाही मात्र काटोल पोलीसांकडे असल्याचे सांगितले जाते. यावरून माजी ‌नगराध्यांना अटक केली अशी चर्चा आहे. पोलीसांचा दुजोरा मिळाला नाही. मात्र याप्रकरणी काटोल पोलींसांची घाई?की दडपशाही? असा सवाल काटोलकर करत आहेत ‌.

राहूल देशमुख यांचे अटकेला राजकिय किनार!!! २४ मे चे पहाटे राहूल देशमुख यांचे अटके बाबद काटोल नगरी चे सामान्य नागरिकात असलेल्या चर्चे प्रमाणे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राहून देशमुख यांनी सत्तारुढ पक्ष व त्या पक्षाचे राजकिय अपयशाची जाहीर चिरफाड करत होते. राहूल देशमुख यांचा प्रचार पद्धत सत्ताधारी दला चे‌‌ नेते पचवू शकले‌ नाही करिता राहूल देशमुख यांची अटक हा सत्तापक्षाचा रडीचा डाव पोलीसांचे मार्फत साधत तर नाही ना? असा सवाल काटोल करत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: