Saturday, November 23, 2024
Homeव्यापारक्विक हीलची पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आरोग्यसेवेची भेट...

क्विक हीलची पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आरोग्यसेवेची भेट…

पिंपरी-चिंचवडमधील सीमांत व आदिवासी समुदायांना वैद्यकीय व्हॅन देणगी स्वरूपात दिली…

क्विक हीलने आपल्या सीएसआर विभागामार्फत आज पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सीमांत व आदिवासी समुदायांना एक अत्याधुनिक वैद्यकीय व्हॅन देणगी स्वरूपात दिली आहे. ‘रीअल लाइफ रीअल पीपल’ ही स्वयंसेवी संस्था व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सावली निवारा केंद्र यांच्या सहयोगाने ही व्हॅन २५,००० हून अधिक रहिवाशांच्या दारात आवश्यक आरोग्यसेवा पोहोचवणार आहे, यांत पीसीएमसीच्या निवारा घरात राहणा-या २०० हून अधिक बेघर वयोवृद्धांचा समावेश आहे.

वैद्यकीय व्हॅन सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग (आयएएस) आणि क्वीक हील फाउंडेशनच्या अध्यक्ष अनुपमा काटकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अतिरिक्त उपायुक्त उल्हास जगताप, सामाजिक विकास विभागाचे उपायुक्त श्री. चंद्रकांत इंदलकर, पीसीएमसीच्या आयटी व सीएसआर विभागाचे प्रमुख श्री. नीलकांत पोमण व पीसीएमसीचे सीएसआर विभाग अधिकारी विजय वावरे हेही उपस्थित होते.

या भागातील निम्न-उत्पन्न कुटुंबातील जागरूकता व संसाधने यांच्या तीव्र अभावामुळे लोकांना मुलभूत वैद्यकीय सुविधांची निकडीची आवश्यकता असतानाही त्यांपासून वंचित राहणे भाग पडते. ही पूर्णपणे सुसज्ज वैद्यकीय व्हॅन जिल्ह्यातील गरजू समुदायांना चांगल्या आरोग्याची भेट देणार आहे. यांमध्ये कुपोषणाने ग्रस्त असलेले अनुसूचित जमाती व भटक्या जमातींतील लोक, स्त्रिया, लहान मुले तसेच एचआयव्ही व टीबीचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांचा समावेश असेल.

क्विक हील फाउंडेशनच्या चेअरपर्सन तसेच क्वीक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या ऑपरेशनल एक्सलन्स विभागाच्या प्रमुख श्रीम. अनुपमा काटकर यावेळी म्हणाल्या, “आरोग्यसेवा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणे आमच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक असल्यामुळे आम्ही स्थापना झाल्यापासून सार्वजनिक आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करत आहोत.

आमच्या ‘आरोग्य यान’  या उपक्रमाखाली आम्ही देशातील ग्रामीण भागांत काम करणा-या स्वयंसेवी संस्थांना पूर्णपणे सुसज्ज अशा अत्याधुनिक वैद्यकीय व्हॅन्स देणगी म्हणून देतो. पिंपरी-चिंचवडला दिलेल्या देणगीमुळे आम्ही देणगी दिलेल्या व्हॅन्सची संख्या आता १४ झाली आहे, भारतातील १० वेगवेगळ्या राज्यांत ५२०हून अधिक दुर्गम खेड्यांचा या क्षेत्रात समावेश होतो आणि ग्रामीण भागातील ४.५ लाख नागरिकांना याचा लाभ होत आहे.”

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: