युनायटेड नेशन्सच्या शाश्वत विकास उद्दीष्टांनुसार वंचितांना मुलभूत उपचार आणि आवश्यक चाचण्या सुलभरित्या उपलब्ध करून देण्यासाठी क्विक हील या अग्रगण्य सायबरसुरक्षा सेवा प्रदाता कंपनीने आपल्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून बारपेटा, आसाममधील ग्रामीण समुदायाला संपूर्ण सुसज्ज वैद्यकीय व्हॅन ‘आरोग्य यान’ दान केली.
ही अत्याधुनिक पूर्णपणे सुसज्ज वैद्यकीय व्हॅन २०,००० हून अधिक व्यक्तींना सेवा देते, ज्यांना यापूर्वी प्राथमिक आरोग्य सुविधा घरपोच मिळवण्यासाठी १० ते ३० किमी अंतर पायी चालत जावे लागत होते. या सेवेमुळे सार्वजनिक कल्याण आणि उत्तम आरोग्याला चालना देणा-या विविध सरकारी योजनांबाबत लाभार्थ्यांमध्ये जागरूकतेचा प्रसार होण्याची अपेक्षा आहे.
सृजन एक सोच या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने, या उपक्रमाचा उद्देश उपेक्षितांसाठी मूलभूत उपचार आणि आवश्यक चाचण्या सुलभ करणे हा आहे. विशेष हस्तांतरण समारंभास श्री आयुष गर्ग, आयएएस, बारपेटा, सुश्री दिशा श्रीवास्तव, सीईओ, सृजन एक सोच, श्रीमती अनुपमा काटकर, क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा यांच्यासह सन्माननीय अतिथी श्री बिक्रम ज्योती दास (एक दृष्टिहीन गिर्यारोहक ज्यांनी अलीकडेच एव्हरेस्ट शिखरावर चढाई केली आहे) उपस्थित होते.
क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या चीफ ऑफ ऑपरेशनल एक्सलन्स श्रीम. अनुपमा काटकर म्हणाल्या, “क्विक हीलची सीएसआर मिशन ‘सिक्युरिंग फ्युचर्स’ भविष्यकालीन व शाश्वत आहे.
आरोग्य यानाद्वारे गरजेच्या वेळी योग्य वैद्यकीय उपचार सुविधा मिळण्यापासून वंचित राहणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या अत्याधुनिक संपूर्ण सुसज्ज वैद्यकीय व्हॅन्सनी व्हॅन्स ७ राज्यांमधील ४५० हून गावांपर्यंत पोहोचत ३.५ लाखांहून अधिक व्यक्तींना सेवा देत आहेत. बारपेटा, आसाममधील या योगदानाच्या माध्यमातून आम्हाला या दुर्गम गावांमधील २०,००० व्यक्तींना दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा घरपोच उपलब्ध करून देताना आनंद होत आहे.