Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीमतीमंद अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला शिक्षा…

मतीमंद अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला शिक्षा…

आकोट – संजय आठवले

पो.स्टे. हिवरखेड येथे दाखल झालेल्या गुन्हयामधील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय आकोट न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांच्या न्यायालयाने भा.दं.वि चे कलम ३७६ (२) (फ), भादंवि १५ (पंधरा फक्त) वर्ष रु. २०,०००/- (रुपये वीसहजार फक्त) दंड, ३७६ (२) (ल) भादवि १५ (पंधरा फक्त) वर्ष रु. २०,०००/- (रूपये वीसहजार फक्त दंड, ४५२ भादंवि ३ (तीन फक्त) वर्ष रु. १०,०००/- (रूपये दहाहजार फक्त दंड, ५०६ भादंवि ३ (तीन फक्त) वर्ष रु. १०,०००/- द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली असून द्रव्यदंड न भरल्यास २० हजारांकरिता तीन तीन वर्षांचा अधिकच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि त्यासोबतच १० हजार रूपयांकरिता एक एक वर्ष अधिकच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुना्वली आहे.

वरील शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाच्या असून, द्रव्यदंडाच्या शिक्षा एक नंतर एक अशा भोगाव्या लागतील. आरोपीने द्रव्यदंड भरल्यास त्यामधील पन्नासहजार रुपये नुकसान भरपाईपोटी पिडीतेच्या आईला देण्याचा आदेश करण्यात आला आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी आहे की, दि. ३१.८.२०२० रोजी पो.स्टे. हिवरखेड यांच्या हद्दीमध्ये संतोष सिताराम इंगळे याने एका मतीमंद अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची फिर्याद पो.स्टे. हिवरखेड येथे नोंदविली गेली. त्यावरून आरोपी विरूध्द कलम ३७६ (२) (एल) (एफ), ४५२,५०६ भादंवि व प्रमाणे प्रकरण दाखल झाले. सदरील प्रकरणामध्ये आरोपीने पिडीतेवर केलेल्या अत्याचारांबाबत पो.स्टे. हिवरखेड यांनी संपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदरील दोषारोपपत्राची न्यायालयाने दखल घेवून आरोपी संतोष सिताराम इंगळे विरूद्ध वरील प्रमाणे दोषारोपण करून न्यायालयात खटला चालविला. आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्याकरिता सरकार पक्षांच्या वतीने एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. सरकार पक्षांचा व आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर वि. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.

वरील प्रकरणामध्ये सरकार पक्षांच्या वतीने जी.एल. इंगोले सहायक सरकारी अभियोक्ता, आकोट यांनी या प्रकरणात सक्षम बाजू मांडून जोरदार युक्तिवाद केला. वरील प्रकरणाचा तपास पो.उप.नि. अनुराधा रामकृष्ण पाटेखेडे यांनी केला. पो. कॉ. विलास अस्वार ब.नं. ७९१ पो.स्टे. हिवरखेड यांनी पैरवी म्हणून न्यायालयात केसमध्ये सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: