पुणे : पुण्यात काल मध्यरात्रीच्या दरम्यान दुहेरी हत्याकांड घडल्यामुळे एकच खळबळ उडाली असून पुणे पोलिसांना तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे. दोघांवरही धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा प्रकार एका माजी नगरसेवकाच्या घरासमोरच घडला असल्याचे समोर आले आहे. या हत्याकांड प्रकरणी येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या महिरीनुसार, पुण्यातील पांडू लमाण वस्ती इथं मध्यरात्री 3 वाजता दुहेरी हत्याकांडाची ही घटना घडली. अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावं आहेत. त्यांच्यावर चक्क तलवार आणि पालघन सारख्या धारदार हत्याराने वार करून त्या दोघांचा निर्घुण खून करण्यात आला.
तर पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. येरवडा पोलिस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहे. या दोन्ही हत्यांमागे मूळ कारणं नेमकं काय आहे, याचा छडा लावण्याचं आणि मारेकऱ्यांना अटक करण्याचं आव्हान सध्या पोलिसांकडून केलं जातं आहे. येरवडा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली या हत्याप्रकरणाचा कसून तपास केला जातोय.
अनिल आणि सुभाष यांच्यावर धारदार शस्त्राने नेमका कुणी वार केला? या हत्येमागचा हेतू काय होता? मध्यरात्री घडलेल्या या हत्याकांडाचा कट कुणी रचला होता? या सगळ्या प्रश्नांची आता पोलिसांच्या तपासाअंती समोर येतील. अद्याप या दुहेरी हत्याकांडप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.