Tuesday, October 22, 2024
Homeमनोरंजनपुणेकरांना अनुभवता येणार प्रख्यात संगीत उस्तादांच्या संगीतमय आवाजाचा नजराणा...

पुणेकरांना अनुभवता येणार प्रख्यात संगीत उस्तादांच्या संगीतमय आवाजाचा नजराणा…

बकार्डी एनएच७ वीकेण्‍डरचे पुण्यात पुनरागमन; २५ ते २७ नोव्हेंबर रोजी आयोजन

भारतातील उत्साहपूर्ण बहु-शैली संगीत फेस्टिवल ‘बकार्डी एनएच७ वीकेण्डर’ भारतीय प्रेक्षकांना यंदाच्या सर्वात प्रभावी लाइन-अप्ससह मंत्रमुग्ध करण्यास सज्ज आहे. हा फेस्टिवल त्याचे होम ग्राऊंड पुणे येथे २५ ते २७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. थीम ‘#१३मेरावीकेण्डर अंतर्गत १३व्या पर्वासाठी परतत असलेला बकार्डी एनएच७ वीकेण्डर भारतातील बहुप्रतिक्षित फेस्टिवल आहे आणि वर्षानुवर्षे या फेस्टिवलची लोकप्रियता व उपस्थिती वाढत आहे.

‘ग्लॅस्टनबरीला भारताचे उत्तर’ म्हणून ओळखले जाणारे, बकार्डी एनएच७ वीकेण्डरने यावर्षी भारतीय चाहत्यांसाठी काही आश्चर्यकारक गोष्टी आणत आहे. स्वीडिश जॅझ, आरअॅण्डबी/सोल, पॉप बॅण्ड डर्टी लूप्ससह प्रसिद्ध अमेरिकन फोक रॉक बॅण्ड द ल्युमिनियर्स पहिल्यांदाच आशियाई मंचावर त्‍यांचे हेडलाइनर अॅक्ट्स सादर करणार आहे.

तसेच पॉवरहाऊस डीमव्हीले क्रूचा अमेरिकन रॅपर जे.आय.डी. त्याच्या नवीन हिप-हॉप अल्‍बमसह मंचावर धुमाकूळ निर्माण करेल. या लाइन-अपमध्ये दुसरा हिप हॉप आकर्षण आणि टॉप १० यूके चार्ट सिंगलमध्ये स्थान असलेला भारतीय वंशाचा पहिला रॅपर पीएव्ही४एन, तसेच पॉवर-पॅक इस्रायली एक्स्पेरिएन्शियल रॉक बॅण्ड टायनी फिंगर्स यांचा देखील समावेश आहे.

४० हून अधिक स्थानिक व जागतिक कलाकारांचा समावेश असलेल्या या फेस्टिवलमध्ये ब्लडीवुड,  द एफ१६एस,  यशराज आणि हनुमानकाइंड या भारतीय कलाकारांचे उत्साहवर्धक परफॉर्मन्स पाहायला मिळतील. पाच टप्पे विविध प्रकारच्या शैलींसोबत हाय एनर्जी हिप हॉप अॅक्ट्स ते सोल-स्टिअरिंग बॅलार्डसना सादर करतील, ज्यामध्ये भारतीय कलाकारांसह क्रस्ना, सेझ अॅण्ड द एमव्हीएमएनटी, शाश्वत बुलुसू, रेबल, झॅली, मेनी रूट्स एन्सेम्बल,

एमसी अल्‍ताफ (लाइव्ह), अनुमिता नादेसन, द डाऊन ट्राडेन्स, द दर्शन दोशी ट्रिओ फीट हॅशबास अॅण्ड रिकराज नाथ, अनुव जैन व रामण नेगी यांचा समावेश असेल. उत्साहपूर्ण मनोरंजन सादर करण्याच्या आपल्‍या परंपरेशी बांधील राहत या फेस्टिवलमध्ये पहिल्यांदाच काही पाहण्यासारखे परफॉर्मन्स आहेत, जसे रूडी मुक्ता, दोहनराज अॅण्ड द पेक्युलिअर्स, पीके, उत्सवी झा, करश्नी, आदी, गौरी व अक्षा, वेल्वेट मीट्स ए टाइम ट्रॅव्हलर, वाइल्ड वाइल्ड विमेन, डॅप्पेस्ट + आदी, फॉक्स इन द गार्डन, पर्प एक्स लिन्फॉर्मेशन, साची आणि मेबा ऑफिलिया.

नॉडविन गेमिंगचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, “बकार्डी एनएच७ वीकेण्डर हा पहिला व सर्वात महत्त्वाचा संगीत आणि कलेचा उत्सव आहे. ए.आर. रहमान, स्टीव्ह वाय, जो सॅट्रियानी, मेगाडेथ, कोडालिन, स्टीव्हन विल्सन, सिगारेट्स आफ्टर सेक्स, चेट फेकर आणि इतर जागतिक शोस्टॉपर्स यांसारखे जगप्रसिद्ध कलाकार आमच्याशी संलग्न आहेत, जे न्युक्लिया, रित्विज, प्रतीक कुहड, डिवाइन, द लोकन ट्रेन अशा भारतीय इंडी हार्टथ्रोब्सप्रमाणेच एकाच मंचावर परफॉर्मन्स सादर करतात.

हे खरोखरंच भारतातील संगीतक्षेत्रासाठी एक संगम ठिकाण आहे. यावर्षीच्या एनएच७ वीकेण्डरची थीम # १३मेरावीकेण्डर आहे आणि आम्ही पुन्हा एकदा चाहत्यांना सिग्नेचर वीकेण्डर अनुभव देण्यासाठी या वर्षाच्या कलाकारांच्या श्रेणीतून अनेक शैलींना सादर करत आहोत.’’

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: