Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayभाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन...

भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन…

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार तथा माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज गुरुवारी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या त्यांच्या पश्चात पती शैलेश, मुलगा कुणाल आणि मुलगी चैताली असा परिवार आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुक्ता टिळक यांच्या निधनाची बातमी भाजपचे नेते माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ट्वीट करीत माहिती दिली.

मुक्ता टिळक यांना २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. महापालिकेच्या इतिहासात भाजपाची प्रथमच सत्ता आल्यानंतर भाजपाच्या पहिल्या महापौर होण्याचा मान मुक्ता टिळक यांना मिळाला होता. अडीच वर्षे त्या महापौर होत्या. नगरसेवक असतानाच त्यांनी २०१९ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: