प्रसिद्ध साहित्यिक प्रा.विजया मारोतकर यांच्या हस्ते प्रकाशन…
कादंबरीकार विजया ब्राम्हणकर यांची प्रमुख उपस्थिति…
विदर्भ साहित्य संघ शाखा,रामटेकतर्फे आयोजन…
रामटेक – राजु कापसे
विदर्भ साहित्य संघाच्या रामटेक शाखेतर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शिल्पा ढोमणे लिखित ‘ऋणानुबंध व ‘अभिलाषा’ या दोन कादंबर्यांचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक विजया मारोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्त प्रसिद्ध कादंबरीकर विजया ब्राह्मणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानी वि.सा.संघ रामटेक शाखेचे अध्यक्ष दीपक गिरधर होते. सदर प्रकाशन सोहळा २० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रामटेकच्या सभागृहात पार पडला. यावेळी मंचावर राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजुजी बर्वे, लेखिका सौ.शिल्पा ढोमणे, कादंबऱ्यांवर भाष्य करणारे भाष्यकार डॉ.जगदीश गुजरकर व जयश्री पांगारकर, डाॅ.अंशुजा किंमतकर , प्रा.डाॅ.गिरीश सपाटे, प्रा.डाॅ.सावन धर्मपूरीवार हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी साहित्यिक प्रा.विजया मारोतकर, विजया ब्राम्हणकर, भाष्यकार डॉ.जगदीश गुजरकर, जयश्री पांगारकर,अध्यक्ष दीपक गिरधर, प्राचार्य राजुजी बर्वे यांचा रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रा.विजया मारोतकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कादंबर्यांचे प्रकाशन करण्यात आले. वि.सा.संघाच्या वतीने लेखिका शिल्पा ढोमणे आणि त्यांचे पती प्रवीण ढोमणे यांचा शाल,श्रीफळ,गुलाबाचे रोपटे आणि स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
जयश्री पांगारकर व डाॅ.जगदीश गुजरकर यांनी अनुक्रमे ऋणानुबंध’ व ‘अभिलाषा’ या कादंबर्यांवर समिक्षणात्मक भाष्य केले. दोन्ही कादंबर्या ह्या विज्ञानवादाव्दारे मानवतावादी मुल्ये जोपासणार्या तसेच व्यक्तिस्वातंञ्याचा पुरस्कार करणार्या असल्याचा अभिप्राय भाष्यकारांनी दिला. प्रा.विजया मारोतकर यांनी बोलताना, कादंबर्यांमध्ये वैद्यकीय, कायदेविषयक अभ्यासपूर्ण विषय हाताळणीसाठी लेखिका शिल्पा ढोमणे यांचे कौतुक केले.
विजया ब्राम्हणकर यांनी कादंबरीतून हळूवारपणे डोकावणारी मानवी मुल्यांची गुंतागुंत आणि लेखनातील नियोजनबद्धता अधोरेखित केली. प्राचार्य राजू बर्वे यांनी लेखिकेस अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाध्यक्ष दीपक गिरधर यांनी अध्यक्षीय विचार मांडले. विदर्भ साहित्य संघ शाखा, रामटेकचे कार्याध्यक्ष डॉ.सावन धर्मपुरीवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सचिव, डाॅ.पवन कामडी यांनी कार्यक्रमाचे सुञसंचालन केले.
तर उपाध्यक्ष प्रा.डाॅ.गिरीश सपाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाला साहित्य क्षेञातील मान्यवर, रसिक-श्रोते, साहित्याभ्यासक, विद्यार्थी इत्यादींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.वि.सा.संघाच्या रामटेक शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.