Sunday, December 22, 2024
Homeराज्य'व्हॉइस ऑफ मीडिया’ अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन..!

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन..!

ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांची उपस्थिती…

रामटेक – राजु कापसे

देशभरातील क्रमांक एकची संघटना असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या १८ व १९ नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाच्या लोगोचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, मंत्री शंभूराजे देसाई व संघटनेच्या राज्य कार्यवाहक यास्मिन शेख प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील लोगोचे प्रकाशन केले.

बारामती येथे होणाऱ्या या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांची देखील उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.

अधिवेशनाची वेगाने तयारी होत असून अधिवेशनाला येणाऱ्या पत्रकारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. संघटनेची कामगिरी कौतुकास्पद : मुख्यमंत्री जेमतेम तीन वर्षाच्या काळात संघटनेने पत्रकारांसाठी व त्यांच्या समस्या निवारण्यासाठी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण असून शासन दरबारी पाठपुरावा देखील वेगाने होत आहे.

या अधिवेशनातून राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेता येतील व त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तळमळ महत्वाची : शरद पवार मोजकेच पत्रकार वगळता राज्यातील हजारो पत्रकार बांधवांना अनेक समस्या, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न व विशेष म्हणजे पत्रकारांबद्दलची तळमळ ही महत्त्वाची बाब आहे.

अधिवेशनातून त्यांच्या समस्यांना निश्चितच वाचा फुटेल. आमच्यासारख्या नेत्यांनाही एकाच वेळी हजारो पत्रकारांना भेटता येईल याचा आनंद आहे. अधिवेशनाचे फलित होईल : अजित दादा एवढ्या मोठ्या संख्येने राज्यभरातून पत्रकार बारामतीत येणार ही आनंदाची बाब आहे. सर्व पत्रकारांचे स्वागत आहे त्यांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी अधिवेशनातून एकजुटीने होणारे प्रयत्न निश्चितच फलदायी ठरतील.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: