Saturday, October 19, 2024
Homeराज्यखामगांव | मराठा आरक्षण आंदोलनाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचा जाहीर पाठिंबा...

खामगांव | मराठा आरक्षण आंदोलनाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचा जाहीर पाठिंबा…

हेमंत जाधव

खामगांव दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने सकल मराठा समाज खामगांव यांच्या ठिय्या आंदोलन मराठा आरक्षण मोर्च्याला जाहिर पाठिंबा देत दिनांक १३ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या, मराठा आरक्षण मोर्च्याला जिल्ह्यातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे पदाधिकारी.

कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात यावे हि न्याय मागणी असुन शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षणा द्यावे अशी संघटनेची मागणी आहे.

संघटनेच्या वतीने मराठा समाज आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा असे प्रतिपादन संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर यांनी केले याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनोने , शेगाव तालुकाध्यक्ष श्रीराम गायकवाड , जिल्हा संघटक शंकर वाघ , शहर अध्यक्ष सुधाकर वानखडे , दिलीप इंगळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: