Monday, December 23, 2024
Homeराज्यसार्वजनिक शिवजयंती नियोजनाची विचारसभा बैठक...

सार्वजनिक शिवजयंती नियोजनाची विचारसभा बैठक…

पातुर तालुक्यातील दिग्रस बु!! येथे छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा दोन दिवसीय जन्मोत्सव विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरा करण्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांची सहविचार सभा जिल्हा परिषद केंद्र शाळा दिग्रस बु च्या प्रागणात २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली होती.

या सभेमध्ये दिनांक १८ आणि १९ फेब्रुवारी अशा दोन दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन करून यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पाच गटा मध्ये चित्रकला स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, महिलांसाठी घरोघरी रांगोळी स्पर्धा, वाशिम येथील “”अंध कलाकार चमूचा चेतन सेवांकुर आर्केस्ट्रा””, छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र लावून सजवलेला रथातून लेझीम बँड पथकासह वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक,सामाजिक प्रबोधनासाठी कीर्तनाचा कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सहभागी असलेले कार्यक्रम अध्यक्ष बाबाराव बराटे ,सोनू ताले, माजी उपसरपंच मनोज गवई, राजेंद्र ताले, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील विश्राम गवई, पोलीस पाटील नितीन बाबुराव गवई ,जेतवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष माणिकराव गवई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव सरप, सुधाकर कराळे,उपसरपंच सदानंद बराटे,अजित ताले, हसनराव गवई,

गोपाल जगन्नाथ गवई, वैभव सेवकराम गवई, पोस्टमन शिवहरी ताले, सुभाष लहाने, बाजीराव ताले, राहुल सोनोने, सुखलाल आत्माराम ताले, विजय गुलाबराव ताले, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र तुळशीराम कुकड्कार, धीरज अशोक गवई, मेजर रोशन अरखराव ,मेजर राहुल गवई, संदेश गवई, पांडुरंग चोरे, तेजराव गवई, विनोद ताले, समाधान शिरसाट, संतोष अंबादास ताले, बाबाराव सुरवाडे, देवानंद नामदेव गवई,

शिवहरी जगन्नाथ गवई, यांनी प्रत्यक्ष नियोजनासाठी चर्चेमध्ये सहभागी होऊन दर्जेदार कार्यक्रम होण्यासाठी एकजुटीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत राहू असे सांगितले सभेमध्ये कार्यक्रमाचे सनियंत्रण नियोजनबद्ध यशस्वीतेसाठी समिती गठित करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन दिलीप गवई यांनी केले तर राहुल सोनोने यांच्या आभार प्रदर्शनाने नियोजन सभेची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: