येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापुर विधानसभा करिता अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ तायडे यांनीही मूर्तिजापुर विधानसभेसाठी आपली दावेदारी दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल सायंकाळच्या सुमारास करण्यात आले. यावेळी मूर्तिजापुर विधानसभेचे राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर सह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे ही उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) यांच्या कडून मूर्तिजापुर विधानसभेसाठी जागा मागू शकते यासाठीच मूर्तिजापुर तालुक्याच्या वतीने प्रयत्न सुरु असून त्या माजी आमदार तुकाराम बिडकर आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे यांनीही उडी घेतली असून शहरातील स्थानिक आणि सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून सिद्धार्थ तायडे यांच्यासाठी उमेदवारी मागू शकतात. त्याची पूर्व तयरी म्हणून मूर्तिजापुर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तुकाराम भाऊ बिडकर, कृष्णा भाऊ अंधारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रूपालीताई वाकोडे जिल्हाध्यक्षा, माधुरीताई वाघमारे तालुकाध्यक्षा अकोला, जगदीश मारटकर तालुकाध्यक्ष मुर्तीजापुर, सरवर बेग प्रदेश सचिव अल्पसंख्यांक सेल भास्कर फुके बाळासाहेब तायडे, गौरव देशमुख, दीपक भाऊ गावंडे, गजानन पाटील, ज्ञानेश्वर ताले, अनंता गावंडे,रामाभाऊ अमानकर,प्रशांत गायकवाड, महेबूब खान, हाजी निसार, अबूतला अन्सारी, विनोद कोगदे, जाकिर भाई, रणजीत इंगळे, विकास वानखडे, शरद लकडे, यांच्यासह बरेच कार्यकर्ते उपस्थित होत.