सांगली – ज्योती मोरे
आज शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेना महिला आघाडी आणि युवा सेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबीयांबद्दल उद्धव साहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि ठाकरे कुटुंबाबद्दल अवमान जनक वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांचा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करून कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळ फासले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले ज्या थाळीमध्ये खायचे त्याच थाळीत घाण करायची सवय रामदास कदम ला आहे आणि म्हणून ज्या बाळासाहेब ठाकरेनी रामदास कदमला नेता केलं आमदार केलं मंत्री केलं एवढं भर भरून दिलं त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल त्या कुटुंबाबद्दल मी कधीही आयुष्यात अपशब्द काढणार नाही चुकीचे बोलणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे रामदास कदम यांनी चारच दिवसात आपला खरा रंग दाखवला आणि ठाकरे कुटुंबाबद्दल अवमान जनक वक्तव्य करून स्वतः रामदास कदम यांनी ज्या आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्यामध्येच भेसळ आहे की काय हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय जनता पार्टीची सुपारी घेऊन शिवसेनेवर आग पाखड करणे हा एकमेव उद्योग एकनाथ शिंदे गटाच्या आमदार नेत्यांनी चालवलेला आहे खरंतर आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी गेलो आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्यासाठी गेलो या ज्या वल्गना या गटाकडून केल्या जात आहेत त्याला छेद देण्याचा काम त्याला काळ फासण्याचे काम हे रामदास कदम आणि शिंदे गटातील इतर नेते करत आहेत.
एकनाथ शिंदे खरोखरच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार असतील असं त्यांना वाटत असेल तर बाळासाहेबांच्या कुटुंबाबद्दल इतक्या नीच पातळीवर टीका करणाऱ्या रामदास कदम यांची शिंदे गटातून नेते पदावरून हकालपट्टी केली गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर तुम्ही त्यांना पाठीशी घातलं तर तुम्ही बाळासाहेबांचा फक्त नावच वापरत आहात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अन्यथा बाळासाहेबांच्या विचाराचा तुम्हाला काही देणं घेणं नाही असा त्याचा अर्थ होईल अशी आमची या ठिकाणी स्पष्ट भावना झाली आहे.
त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देणाऱ्या रामदास कदम यांला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही इथून पुढच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाची माफी रामदास कदम आणि मागावी अन्यथा शिवसेना सांगली जिल्ह्यामध्ये रामदास कदमाला पाय ठेवू देणार नाही,
अशा पद्धतीचा इशारा आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने देत आहोत आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर जिल्हा संघटक बजरंग पाटील महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुजाता इंगळे उपजिल्हाप्रमुख मनीषा पाटील शहरप्रमुख सुनंदा पाटील शहरप्रमुख मयूर घोडके रुपेश मोकाशी सुरेश साखळकर संतोष पाटील.
स्नेहलताई माळी माधुरी चव्हाण राजेंद्र पाटील.विजय गडदे.संजय वडर नईम शेख.सूरज पवार.मुस्तिकम मुलाणी.प्रथमेश शेटे.सुमित पवार.प्रताप पवार.रमेश पवार राकेश आवळे.किरणसिंग रजपूत.सचिन अलकुंटे ओंकार रजपूत.मुस्तकिम आत्तार.गजानन हंकारे.नितीन काळे.शिवराज काळे.मुफित कोळेकर.इस्माईल मुजावर सलमान नगारजी.मोसिन शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते.