मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
दिनांक 13 मार्च 2024 रोजी वाशिम जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने अँड पी .पी. अंभोरे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा खा. अनंत हेगडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला राज्यघटना बदलण्यासाठीच हव्यात 400 जागा त्यासाठी सभागृहात दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे म्हणूनच 400 जागांचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
असे संविधान विरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा खासदार आनंद हेगडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला.त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा तसेच केंद्रातील भाजपा सरकार संघ व मनुवादी विचारसरणीचे लोक हे त्यांचा छुपा एजंट राबविण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत तसेच केंद्रातील भाजपा सरकारला देशात हुकुमशाही आणायची आहे त्यासाठी भारतीयांवर मनुवादी विचारधारा लादण्याचा डाव उघड झाला आहे.
ही बाब देशासाठी अतिशय चिंताजनक आहे अशी वक्तव्य करून भाजपा संविधान संपविण्याची षडयंत्र रचित आहे तेव्हा खासदार आनंद हेगडे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनावर वाशिम जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड. पी.पी. अंभोरे वैभव सरनाईक सभापती जिल्हा परिषद वाशिम मा.परसरामजी भोयर मा महादेवराव सोळंके शंकर वानखेडे शहराध्यक्ष राजू जानी वाले किशोर पेंढारकर समाधान माने उत्तम खडसे सुभाष देवहंस भारत गुडदे नारायण कंकाळ कौसर खान याकूब भाई राजू कांबळे भाई जगदीश कुमार इंगळे बाळासाहेब भगत सागर जगताप भागवत कानडे दादाराव कालापाड मनोज इंगोले सागर खंडारे दादाराव कालापाड इत्यादी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.