बुलढाणा – हेमंत जाधव
आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी बजरंग दल व अन्य हिंदू संघटनाच्या वतीने बंद चे आव्हान करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत सर्व व्यापारी बांधवांनी स्वयमस्पूर्तीने कडकडीत बंद पाळला आहे, खामगाव येथील गांधी पुतळा येथे सकल हिंदू समाज जमा होऊन बांगलादेशातील मृत्युमुखी झालेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहली नंतर शांततेच्या मार्गाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, यावेळी बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक अमोल अंधारे यांनी हिंदू युवकांनी संघटित व्हावे व कोणत्याही हिंदू उत्सवात व्यसन करू नये असे आव्हान केले,