गुंड प्रवृत्तीवर कारवाई व्हावी यासाठी ९ जानेवारीला मुक मोर्चा
अकोला शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी विद्यार्थी याला मेस चा डबा आला नाही.म्हणुन बहीनीला काहीं तरी खायला आणायला गेलेल्या भावाला शहरांतील गुन्हेगारांचे टोळीने केवळ मित्राच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणुन हत्या करण्यात आली आहे.
या हत्येत निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेला असून या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करावी या मागणीसाठी तसेच शहरात वाढलेली गुन्हेगारी थांबवण्यासाठी दि.९ जानेवारी रोजी दुपारी साडे बारा वाजता संभाजी पार्क येथून मूक मोर्चा प्रारंभ होणारं आहे. या मोर्चात शहरातील पालकांनी, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार नितिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या पत्रकार परिषदेत आमदार नितिन देशमुख यांनी सांगितले की,१० हजार लोक सहभागी होतील. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी यासाठीच हा मोर्चा असून शहरातील १७ कोचिंग क्लास संचालकानीआज सकाळीं बैठक घेतली असून ते या मूक मोर्चा मध्ये उपस्थित होणारं आहेत.
या घटनेबाबत अधिक बोलताना आमदार देशमुख यांनी शहरांतील क्रिमिनल हेच पोलिसांचे वसुली करतात कारण त्यांचेच अवैध धंदे आहेत. त्यामुळें शहरांतील गुंडगिरी वाढलेली आहे. त्यावर पोलिसांनी वचक निर्माण करण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशीही मागणी केली आहे.
या मूक मोर्चासाठी असलेल्या मुद्द्यावर कोणतेही राजकारण करणार नाही असे सांगत आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मुक मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेत बुलडाणा जिल्ह्यातील प्रा सदानंद माळी, सावता सेना जगन्नाथ रोठे, मुख्याध्यापक संघटना प्राचार्य दीपक बोचरेयांनी आपल्या संघटना सहभागी होणारं असल्याचे जाहीर केले.
यावेळी आमदार नितीन देशमुख,माजी आमदार हरिदास भदे, महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा, जिल्हाध्यक्ष राहुल कराळे, बुल्डणा शिवसेना संघटक प्रा सदानंद माळी, सावता सेना जगणाथ नाथ रोठे, मुख्याध्यापक संघटना प्राचार्य दीपक बोचरे, संतोष टापरे, रवी गायकवाड , अभय खुमकर, विशाल घरडे, बंडू सवई, आदींची उपस्थिती होती.