बुलढाणा – हेमंत जाधव
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अकोली, खारोड, निरोड, लोखंडा आणि पाळा या गावातील शेतकरी कोणत्याही कर्ज माफी योजने पासून वंचित असल्यामुळे त्यांनी माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन आपल्या समस्या शासन दरबारी मांडाव्यात या साठी त्यांना अकोली गावा मध्ये आमंत्रित केले होते.
यावेळी सदाभाऊ यांनी सभोवतालच्या काही भागातील गावगाड्यातील शेतकरयांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी सदाभाऊ यांनी उदाहरण दिले की पांढरे सोने पिकविणारा विदर्भ पण त्यावर प्रक्रिया करून पक्का माल मात्र दुसरीकडेच होतो जर विदर्भात स्थानिक कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग सुरू झाले तर येथील यरुणांच्या हाताला रोजगार मिळेल त्यांना रोजगारासाठी पुणे मुंबई ला जाण्याची गरज पडणार नाही.
सभेत सदभाऊनी सभेत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर विचार व्यक्त केले, शेतकऱ्यांना धीर दिला, आपल्या हक्काची लढाई आणि संघर्ष करायला मार्गदर्शन केले आणि या लढाईत मी तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या प्रत्तेक समस्या शासन दरबारी मी ठेवीन आसा विश्वास दिला या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात सदाभाऊ यांचेकडे दिल्या