Sunday, December 22, 2024
Homeराज्यसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शिंदे सरकारचा दिलासा - आता सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शिंदे सरकारचा दिलासा – आता सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी मिळणार…

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती

धीरज घोलप

राज्यात हिंदु सणांचं वैभव वाढवण्यासाठी झटणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

त्यामुळे या मंडळांना दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांचे खेटे मारावे लागणार नाहीत. मुंबईसह पुणे आणि राज्यातील इतर भागांतील मंडळांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव जवळ आला की, राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू होते. एकट्या मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची संख्या काही हजारांच्या घरात आहे.

या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे खेटे घालावे लागतात. यात अनेक मंडळांची अडवणूक होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली या सर्व मंडळांना सरसकट पाच वर्षांची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली.

या निर्णयामुळे सर्व मंडळांना मोठा दिलासा मिळेल. तसंच गणेशोत्सवासारखा विघ्नहर्त्याचा सण निर्विघ्न पार पडेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: