Tuesday, October 15, 2024
Homeराज्यअकोला | प्रत्येक 'पीएचसी'त आता मानसोपचाराची सुविधा...

अकोला | प्रत्येक ‘पीएचसी’त आता मानसोपचाराची सुविधा…

‘मन:शक्ती क्लिनिक’ कार्यान्वित

अकोला – संतोषकुमार गवई

अकोला जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘मन:शक्ती क्लिनिक’ कार्यान्वित करण्यात आले असून, सर्व मानसिक आजारांवर प्रथमोपचार व निदानाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मानसोपचाराची गरज असलेल्या व्यक्तींना या क्लिनिकचा लाभ होणार आहे. आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या पथकाद्वारे रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले जाणार आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी सांगितले.

क्लिनिकद्वारे सर्व मानसिक आजारांवर प्रथमोपचार व निदान केले जाईल. त्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

बातम्या जाहिराती साठी संतोषकुमार गवई ९६८९१४२९७

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: