Monday, December 23, 2024
Homeराजकीयप्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराविरुद्ध निदर्शने गडमुडशिंगी आरपीआय कडून प्रशासन धारेवर...

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराविरुद्ध निदर्शने गडमुडशिंगी आरपीआय कडून प्रशासन धारेवर…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने जात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करीत कारभार सुधारण्याची लेखी हमी आंदोलकांना देण्यात आली.

याबाबत आंदोलकांनी रुग्णालयातील डॉक्टर पेशंटला चांगली वागणूक न देणे, न तपासता वेगवेगळ्या आजारावर एकाच प्रकारची औषधे देणे कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्स मध्ये राहत नसल्यामुळे अपघात व अचानक आजारी पडणाऱ्या रुग्णांची हेळसांड होणे अशा तक्रारी करण्यात आल्या. यावेळी दादासो कांबळे,गणेश कांबळे,विकास कांबळे,अभिजीत कोगले,श्रीमंत कांबळे,अमर कांबळे,प्रविण कांबळे,अकाश जाधव सुशांत कामत,गजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.


RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: