सांगली – ज्योती मोरे.
वालनेस हॉस्पिटलच्या कर्मचारी यांचे थकीत पगार आणि विविध मागण्यासाठी गेले 88 दिवस कर्मचारी आंदोलनला बसले आहेत. तरीसुद्धा वालनेस हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत.तर मिरज मतदार संघातील सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री असून देखील त्यांनी या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आहे.आज 88 दिवस झाले आपल्या विविध मागण्यांसाठी लढत असणाऱ्या शरद भोरे या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
मिरज शासकीय रुग्णालयात शरद भोरे यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश पसरला आहे.जोपर्यंत वालनेस हॉस्पिटल डायरेक्टर आणि अधिकाऱ्यांच्या वर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे.88 दिवस झाले कर्मचारी हे आंदोलन करत आहेत पण वालनेस हॉस्पिटल येथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. लाजिरवाणी गोष्ट आहे की वालनेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा हॉस्पिटलच्या दारात हृदयविकारा झटका आला तरी त्या कर्मचाऱ्याला मिरज शासकीय रुग्णालया मध्ये नेण्यात आले.
इथे येईपर्यंत त्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने कर्मचारी वर्ग हा अधिकाऱ्यांवर संतापलेला आहे. जोपर्यंत वालनेस हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा गंभीरतेचा इशारा नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी दिला आहे. पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कर्मचारी आणि नातेवाईकांना प्रशासन न्याय देणार का? यासंदर्भात कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या कामगाराच्या मृत्यू बाबतीत कामगार न्यायालयात केस दाखल केल्याची माहिती दिली.