Sunday, September 22, 2024
Homeराजकीयगॅस दरवाढी विरोधात सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन...

गॅस दरवाढी विरोधात सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातत्याने स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ झाल्याने तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने त्याचा निषेध म्हणून रस्त्यावर चूल पेटवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करणेत आले.

दरम्यान सर्वसामान्य महिलांचे या दरवाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडले असून यामुळे महिलांना कुटुंब जगवणे मुश्किल झाले आहे. ही दरवाढ अशीच वाढत गेली तर आगामी निवडणुकांमध्ये महिला त्याचे योग्य उत्तर असा इशाराही जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव यांनी दिला.

यावेळी छाया जाधव अनिता पांगम ,वंदना चंदनशिवे ,ज्योती आदाटे अलका माने , सुनिता देशमाने नलिनी पवार, सुरेखा कोळेकर माणिकताई माळी ,मृदुला कुलकर्णी , साधना पाटील , प्रतिभा पाटील , यांचेसह सर्व तालुकाध्यक्ष , शहराध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: