Monday, December 23, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने...

राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आंदोलन…

सांगली प्रतिनिधी:- ज्योती मोरे

आज मा. आ.जयंत पाटील साहेबांच्या निलंबनाचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. जयंत पाटील साहेबांना विधिमंडळ अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करून सरकारने हुकूमशाही मानसिकतेचाच परिचय दिला आहे. मा. जयंत पाटील यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केलं जात असेल तर सरकारच्या मनात सत्तेचा अहंकार किती खोलपर्यंत पसरला आहे याचाच प्रत्यय येतोय. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, भाजप नेत्यांनी कसेही वागावे व विरोधी पक्ष नेत्यांनी निमूटपणे सहन करावे ही कसली अपेक्षा ?

मा.आ.जयंत पाटील साहेब यांचं निलंबन लवकरात लवकर रद्द नाही झाले,तर याचे तीव्र पडसाद उमटतील. यावेळी आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मा. पद्माकर जगदाळे , मा.शेखर माने, विष्णू माने ,असिफ बावा, बिरेंद्र थोरात ,मनगु सरगर, स्वाती पारधी, ज्योती अदाटे, अनिता पांगम ,उत्तम कांबळे,युवराज गायकवाड, समीर कुपवाडे, आयुब बारगिर ,डॉ शुभम जाधव ,बाळाराम जाधव , सुरेश बंडगर, संदीप व्हनमाने, मुन्ना शेख, किशोर हत्तीकर ,महालिंग हेगडे ,अरूण चव्हाण ,अक्षय अलकुंटे, छाया जाधव, अमृता चोपडे, संगीता जाधव, सुरेखा सातपुते , प्रियांका तुपलोंडे, आशुतोष धोतरे, सरफराज शेख, राहुल यमगर ,विजय जाधव , अझहर सय्यद , सागर माने, अभिजित रांजणे,आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: