Tuesday, December 24, 2024
Homeराज्यसांगली । एस टी कष्टकरी जनसंघाच्या पावती वितरणाचा कार्यक्रम माजी आ. नितीन...

सांगली । एस टी कष्टकरी जनसंघाच्या पावती वितरणाचा कार्यक्रम माजी आ. नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे

रा प सांगली आगारातील “एस टी कष्टकरी जनसंघाच्या पावती वितरणाचा कार्यक्रम नितीनराजे शिंदे साहेब ( माजी आमदार) व मा. अविनाश मोहिते ( प्रदेश उपाध्यक्ष कामावर आघाडी भाजपा) यांचे अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

सांगली आगाराची पहिली कष्टकरी जनसंघाची पावती जनसंघाचे मार्गदर्शक तांदळे गुरुजी ( वाहतुक नियंत्रक) यांना डेपो अध्यक्ष सुरेश(भाऊ) माने यांनी वितरित केली. तसेच यावेळी महेश देसाई, अशोक वाघमोडे, अमर वनकळस,अजिनाथ गायकवाड, पोटभरे इ. कष्टकरी कर्मचा-यांना कष्टकरी जनसंघाच्या पावत्या वितरित करण्यात आल्या.

येणा-या काळामध्ये एस.टी.कष्टकरी जनसंघच कर्मचा-यांना न्याय देवू शकतो असे मनोगत कर्मचा-यांनी यावेळी व्यक्त केले, याप्रसंगी जनसंघाचे विभागीय प्रसिद्धी प्रमुख रमेश ढमाळ व सांगली आगार कार्याध्यक्ष सदानंद मदने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: