Tuesday, September 17, 2024
Homeराज्यप्रा.अनंत आगरकर अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी शुभेच्छाचा वर्षाव व...

प्रा.अनंत आगरकर अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी शुभेच्छाचा वर्षाव व सत्कार समारंभ…

अकोला – अमोल साबळे

प्रा.अनंत आगरकर हे दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय नयाअंदुरा येथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी तीस वर्षे सहा महिने विद्यादानाचे कार्य करून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख म्हणून कनिष्ठ महाविद्यालयात कार्यभार सांभाळला. त्या निमित्य त्यांचा निरोप तथा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामसेवा शिक्षण प्रसारक मंडळ भांबेरी चे अध्यक्ष माननीय श्री विजयराव कौसल साहेब हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक श्री मनोहरराव आमले शाळा समिती सदस्य श्री प्रकाश भाऊ कुचके, श्री शरदचंद्रजी वाकळे, श्री अनिल बेलोकर, प्राचार्य भाऊसाहेब शेगोकार यांची उपस्थिती होती.

प्रा.अनंत आगरकर यांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे साधन म्हणून त्यांच्या हाताला कौशल्य देऊन त्यांना निपुण केले. या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व ते स्वयंरोजगार स्थापन करू शकले पाहिजेत या दृष्टीने त्यांनी संस्थेत आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जसे स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा, औद्योगिक भेटींचे आयोजन, परिसर मुलाखत, शिका व कमवा अशा विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन व्यावसायिक क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट समजला जाणारा महाराष्ट्र राज्यातून एका व्यक्तीस दिला जाणारा एनसीईआरटी राष्ट्रीय पुरस्कार *”आदर्श शिक्षक 2008 ” त्यांना देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शिक्षक संघटना मार्फत दिला जाणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” हे सुद्धा त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विविध समित्यांवर पदाधिकारी म्हणून कार्य केले असून त्यांच्या या विविध क्षेत्रातील कार्यामुळे संस्थेला ब दर्जा प्राप्त करून देण्यात त्यांच्या सहकाऱ्यांच्या सह त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने व्यवसायिक अभ्यासक्रमाचा प्रचार व प्रसार करून परिसरामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना महत्त्व प्राप्त करून दिले आहे. तसंच त्यांनी विविध संघटनांचे प्रमुख पदी राहून सामाजिक तथा धार्मिक कार्य केले आहे. त्यांनी भारतीय जैन संघटना, सैतवाल समाज संस्था, कर्मचारी संघटना यांच्या अध्यक्षपदाची सुद्धा धुरा सांभाळलेली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समाजाने सुद्धा त्यांना “समाज गौरव” या उपाधीने गौरवांकित केलेले आहे.

अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी शुभेच्छा देण्याकरता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री विजय भाऊ कौसल साहेब, शाळेचे पर्यवेक्षक श्री रमेश भगत सर, प्रा. विलास ढवळे, प्रा. राजेंद्र तराळे , प्रा. ज्योती वानखडे, श्री.संजय आमले, आदींनी त्यांच्या कार्याच्या गुणगौरव करत त्यांना भावी जीवनाकरता शुभेच्छा दिल्या.

त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाकडून त्यांचा सपत्नीक शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने व विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आणि वैयक्तिक सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीराम परळीकर सर यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय ग्रंथपाल आर डी चितोडे यांनी करून दिला प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब शेंगोकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्रा. संजय शिंगोलकर प्रा. मनीष फोकमारे, प्रा. संजय खडसे, प्रा.दीपक कडू ,प्रा. विलास ढवळे, प्रा. रमेश वाहूर वाघ अंअं श्री पटोकार ,श्री नवलकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला त्यांचे विद्यार्थी नातेवाईक तथा जिजामाता परिवारातील संपूर्ण शिक्षक वृंद गण आदी बांधव उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: