पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीवरून आलेगाव व पातुर वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संयुक्त कार्यवाही करत सातमाथा बीट वनक्षेत्रामध्ये रात्री पाळत ठेवून चोरट्यांकडून 30 सागवान व 2 सायकली असा ऐकून अंदाजे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आलेगाव वनपरिक्षेत्रातील सातमाथा कॅम्प भागात 7 ते 8 सागवान चोर सायकल सहित पातूर येथून आलेगाव वनक्षेत्रात घुसल्याची गुप्त माहिती मिळताच विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव व धीरज मदने वनपरिक्षेत्र अधिकारी पातुर यांनी उपवनसंरक्षक श्री के आर अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक श्री सुरेश वडोदे यांचे मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांसोबत संबंधित क्षेत्रात पाळत ठेवून व नाकाबंदी करून .अवैध वृक्षतोड करून सायकली द्वारे वाहतूक करताना सदरील मुद्देमाल हस्तगत केला. अवैध वृक्षतोड करणाऱ्या चोरट्यांचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला.
मात्र जांगलामधील अंधाराचा फायदा घेत चोरटे सायकल वरील बांधलेला माल सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. सदरील कार्यवाही वनरक्षक अतुल तायडे, लखन खोकड, अविनाश घुगे, बाळासाहेब थोरात, अरुण राठोड, गोपाल गायगोळ, सतीश साळवे, सुरजुसे, व इतर वन कर्मचारी सहभागी झाले होते. अवैध वृक्षतोड करणाऱ्या चोरांचा शोध सुरू असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल ढेंगे करत आहेत.
आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यावर अम्ही रात्री लगेच. नका बंदी केली व जंगलामध्ये त्यांच्यावर पळत ठेऊन चोराकडून आम्ही सागवान 30नग व दोन सायकली जप्त केल्या आहे. अंधाराचा फायदा घेत चोर पळून जाण्यास यशसवी झाले. वन कायद्या अंतर्गत गून्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे . विश्वनाथ चव्हान वन परिक्षेत्र अधिकारी आलेगाव