अमरावती – सुनील भोळे
मा.आयुक्त व मा.उपायुक्त मॅडम यांचे आदेशान्वये गुरुवार दिनांक २६/०७/२०२४ रोजी अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, लिपिक श्री शहबान यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्र.४ बडनेरा प्रभागातील साईनगर, अकोली येथे हातगाड्या वाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असून सदर हातगाड्यांवर अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली.
तसेच हातगाड्याचे छत्र्या, वजन काटे इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.