Sunday, December 22, 2024
Homeराजकीयतिरोडा विधानसभा क्षेत्रातील समस्या मार्गी लागू शकतात पण आपण चुकीच्या लोकप्रतिनिधीला निवडून...

तिरोडा विधानसभा क्षेत्रातील समस्या मार्गी लागू शकतात पण आपण चुकीच्या लोकप्रतिनिधीला निवडून आणल्याने या समस्या मार्गी लागू शकलेल्या नाही : रविकांत (गुड्डू) बोपचे, युवा नेता शरद पवार गुट…

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

गोंदिया – काल तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाडी येथे दिवाळी पर्वा निमित्त “जिवलगा” या मराठी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली मदन पटले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाप्रसंगी रविकांत बोपचे यांनी उपस्थितांना दिवाळी च्या शुभेच्छा देत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलतांना रविकांत बोपचे यांनी सांगितले की, गावातील ग्राम पंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या मध्ये प्रत्यक्ष लोक सहभाग मिळवून गावाच्या हिताचे निर्णय घेतले जातात मात्र वर्तमान मध्ये असे होतांना दिसत नाही,

या मध्ये मोठ्या नेत्यांच्या दबावाखाली राजकारण केलं जातंय, हे कुठ तरी थांबायला हवे. यासह आपल्या क्षेत्रात नागरिकांच्या विविध समस्या आहेत मात्र लोकप्रिनिधींनी उदासीन असून याकडे त्यांच्या लक्ष नाही. आपल्या क्षेत्रातील समस्या मार्गी लागू शकतात पण आपण चुकीच्या लोकप्रतिनिधीला निवडून आणल्याने या समस्या मार्गी लागू शकलेल्या नाही, असे प्रतिपादन यावेळी केले.

याप्रसंगी रविकांत बोपचे यांच्यासह संचालक मदन पटले, डॉ. संदीप मेश्राम, प.स.सदस्य चेतलाल भगत, पो.पा योगेश्वर ठाकरे, भुमेश्वर शेंडे महाराज,भास्कर येळे, डॉ .पुंडलिक बोपचे, से.सा.अध्यक्ष मनोज बोपचे, लक्ष्मीकांत भगत, ओमेष अंबुले, तिलकचंद भगत, माजी सरपंच पौर्णिमा वडगार, उपसरपंच साशिष बंसोड, जागेश्वर येळे, रमेश भोयर, चेतनदास गोखे आदिंसह प्रतिष्ठित मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: