नरखेड – अतुल दंढारे
श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक डाहाका आरती मंडळ नरखेड तर्फे स्थानिक पेठ विभागातील संताजी मंदिरांच्या प्रांगणात महादेवांच्या गाण्याचे डाहाका संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विजेते स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांसह बक्षीस वितरण करण्यात आले व सर्व स्पर्धकांचे अभिनंदन, कौतुक केले….
देवाचे देव महादेवाच्या गाण्याच्या तालावर आणि ढोलक्याच्या ठेक्यावर रसिकांनी डाहाका संमेलनाचा मनसोक्त आनंद घेतला. रसिकांचा हा तुफान प्रतिसाद आणि तयार झालेले संपूर्ण भक्तीमय वातावरण डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
प्रचंड गर्दी, रसिकांची उल्लेखनीय उपस्थिती आणि तरुणांची घोषणाबाजी यामुळे बक्षीस वितरण समारंभ भव्य दिव्य झाले. कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांचा सहभाग उत्साहवर्धक होता. डाहाका आणि जनतेचे नाते किती दृढ आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आपल्या संस्कृतीची ओळख व जतन या संमेलनातून होतेय.
यावेळी वसंतराव कोरडे, संजय कामडे, गोपाल टेकाडे, प्रशांत खुरसंगे,सुरेश शेंदरे, दीपक ढोमने, राजेश क्षीरसागर, रमेश रेवतकर, शरद मदनकर, लीलाधर रेवतकर, रामाजी ठाकरे, शंकर कामडे, जगन घुसे, गणपती बोडखे, पंढरी रेवतकर, भासू मदनकर, मोहन रेवतकर, अरूण टेकाडे, नामदेव मदनकर,भोमराव कडमधाड, दिपक बेहरे, गौरव वैद्य, लक्ष्मण रेवतकर, सारंग दळवी, आशिष बागडे, सुरज झाडे आदी उपस्थित होते.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी चंदू खुरसंगे, देविदास रेवतकर, गणपती रेवतकर, सुरेंद्र बालपांडे, शिवराम कामडे, शंकर बालपांडे, नामदेव टेकाडे, विक्रम बालपांडे, स्वप्निल रेवतकर, रामदास मेटांगळे, संजय रेवतकर, तुकाराम रेवतकर, विशाल बांडे, सुरज मदनकर, रामभाऊ सरोदे, विकास रेवतकर, गोलू धुर्वे व अनेकांनी परिश्रम घेतले.