रोख बक्षिसांची लयलुट…
आकोट – अमृत प्रतिष्ठान व आरंभ ऑर्गनायझेशन द्वारा प्रथमच चंडिकापूर येथे पोळ्याला भव्य अशी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसोबतच गणेशोत्सवानिमित्त बालगोपालांसाठी गणेश आरास सजावट स्पर्धा देखील भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.
या दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस स्मृति चिन्ह प्रतिमा देऊन बक्षीस वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. सोहळा चंडिकापूर नगरीत धुमधडाक्यात पार पडला. या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आरंभ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष कॅप्टन सुनील डोबाळे सीएनजी प्लांटच्या एमडी सौ. वंदना सुनील डोबाळे सरपंच सौ. प्रमिला अढाऊ, बाजार समिती संचालक शंकरराव लोखंडे उपसरपंच राजकुमार खंडेराव,
सुदाम राजदे यासह ग्रामपंचात सदस्य सौ.प्रीती लोखंडे, अनिल नितोने, प्रतिष्ठित नागरिक प्रमोद अढाऊ, गजानन कौलखेडे, दत्तात्रय सोनटक्के, बळीराम अढाऊ यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक पत्रकार संतोष विणके, डॉ. किशोर पुंडकर, विशाल राठोड, सौ सुषमा राहुल भड यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बैल सजावट स्पर्धेतील प्रथम क्र. अंबादास वाशिमकर द्वितीय क्र. सुलक्षण पिलातर तृतिय क्र. एकनाथ अढाऊ तसेच प्रोत्साहन पर बक्षीस विजेते सचिन इंगळे, हरीओम अढाऊ, शंकर नितोने, हर्षल कोल्हे, साहेबराव चव्हाण यांना बक्षीस वितरण करण्यात आले तर गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्र. माऊली जवंजाळ द्वितीय क्र. श्रद्धा दाते तृतिय क्र. ओम सोनटक्के प्रोत्साहन पर विजेते श्रेया इंगळे यांना देखील बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी चंडिकापूर ग्रामस्थांमध्ये दोन्ही स्पर्धांमुळे उत्साह व हर्ष पसरला होता तर दोन्ही स्पर्धेमध्ये एकाहुन एक सजावट करण्यात येऊन उत्साहात सहभाग नोंदविण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत प्रतिष्ठान चे अध्यक्ष आयोजक तुषार अढाऊ यांनी तर आभार खंडेरायांनी मानले. बक्षीस वितरण समारंभाला मोठ्या संख्येने गावकऱ्या मध्ये आंनद व उत्सव च वातरण निर्माण झाले कार्यक्रमाला गावकारीनी तुंडब गर्दी उसळली होती.