Monday, December 23, 2024
Homeखेळमहाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न...

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचवी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस रँकिंग स्पर्धेचे आयोजन नव कृष्णा व्हॅली क्रीडा संकुल एमआयडीसी कुपवाड येथे करण्यात आलेले असून सदर स्पर्धेच्या पाचव्या दिवशी अतिशय चुरशीच्या लढतीत अंतिम स्पर्धेमध्ये खुल्या गटांमध्ये सेनव्होरा डिसोजा मुंबई बँक ऑफ बडोदा प्रथम व मुलांच्या गटांमध्ये चिन्मय सोमय्या प्रथम क्रमांक पटकविले.

आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला होता प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संदीप पाटील डेंटिस्ट कुपवाड यांच्या हस्ते करण्यात आला सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन यांनी केले त्यानंतर डॉक्टर संदीप पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये टेबल टेनिस मुळे एकाग्रता व निर्णय घेण्याची क्षमता अतिशय वेगवान होते प्रत्येकाने किमान दररोज दोन तास ग्राउंड वर खेळले पाहिजे व भविष्यात स्पोर्ट्सकडे करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी पाहावे असे सांगितले शेवटी श्री विनायक जोशी यांनी आभार व्यक्त केले त्यानंतर डॉक्टर संदीप पाटील यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आली.

निकाल पुढीलप्रमाणे खुला गट महिला एकेरी स्पर्धेत सेनव्होरा डिसोजा मुंबई बँक ऑफ बडोदा प्रथम मधुरिका पाटकर मुंबई उपनगर द्वितीय समृद्धी कुलकर्णी सोलापूर तृतीय मधुश्री पाटील मुंबई उपनगर तृतीय खुला पुरुष गट चिन्मय सोमय्या मुंबई उपनगर प्रथम पार्थ केलकर मुंबई उपनगर द्वितीय तन्मय राणे मुंबई उपनगर तृतीय भार्गव चक्र देव पुणे तृतीय 19 वर्षाखालील गटामध्ये मुली अनन्या चांदे मुंबई प्रथम मुक्ता दळवी मुंबई मिताली पुरकर नाशिक तृतीय अनन्या सांगोलकर नागपूर तृतीय 19 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत सिद्धांत देशपांडे ठाणे प्रथम आदित्य जैन पुन्हा द्वितीय अक्षत जैन मुंबई उपनगर तृतीय अर्णव करणावर मुंबई उपनगर तृतीय 17 वर्षाखालील मुली आर्या सांगडकर ठाणे प्रथम काव्या भट्ट ठाणे द्वितीय अनन्या चांदी,

मुंबई उपनगर तृतीय प्रियांका गुप्ते ठाणे तृतीय 17 वर्षाखालील मुले नील मूल्य पुन्हा प्रथम उदित देव ठाणे द्वितीय आयेश यादव ठाणे तृतीय ध्रुव शहा मुंबई उपनगर तृतीय अकरा वर्षे मुलींच्या गटामध्ये मारा संगेकर मुंबई उपनगर प्रथम अर्शिया राय मुंबई उपनगर द्वितीय आद्य बहेटी परभणी तृतीय शरयू टेकाळे तृतीय अकरा वर्षाखालील मुले प्रतीक तुळसानी ठाणे प्रथम मोक्ष शाहारी मुंबई उपनगर द्वितीय आयन आथर मुंबई उपनगर तृतीय सारंग गवळी पुणे तृतीय तेरा वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये रैना भूटा ठाणे प्रथम दिव्यांशी भावमिक मुंबई उपनगर द्वितीय तन्वी चुकका,

मुंबई उपनगर तृतीय नैशा रावसकर पुणे तृतीय तेरा वर्षाखालील मुले मयुरेश सावंत ठाणे प्रथम जॉन चेलीमूवी ठाणे द्वितीय विहान गावंड ठाणे तृतीय मरिथेय कल्याणकर कोल्हापूर तृतीय पंधरा वर्षाखालील मुली रिअन भूता ठाणे प्रथम दिव्यांशी भुवमिक मुंबई उपनगर द्वितीय रितिका मधुर ठाणे तृतीय रुचिता दरवातिकर पुणे तृतीय पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये ध्रुव शहा मुंबई उपनगर प्रथम उदित सचदेव ठाणे द्वितीय अर्णव काशीरसागर मुंबई उपनगर तृतीय पार्थ मगर एम सी डी तृतीय यावेळी महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सुरज फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: