मूर्तिजापूर – महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, सामाजिक सद्भावना वाढीस लागावी, युवा पिढी आंतरभारतीशी जोडल्या जावी या उद्देशाने आंतरभारती ट्रस्टच्या वतीने महात्मा गांधींची प्रासंगिकता या विषयावर राष्ट्रीय स्तरावर सर्व वयोगटातील विद्यार्थी,अध्यापक, पालक व नागरिकांकरिता आयोजित निबंध स्पर्धेअंतर्गत आंतरभारती मूर्तिजापूरच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ श्री गाडगे महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात आज संपन्न झाला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव विष्णू लोडम, आंतरभारती मूर्तिजापूर चे अध्यक्ष प्रा.सुधाकर गौरखेडे, प्राचार्य गजानन बोचरे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर, ग्रामगीताचार्य डॉ. रामकृष्ण गावंडे, प्रा. प्रमोद राजंदेकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.मनिषा यादव यांनी केले. संगितज्ज्ञ श्याम कोल्हाळे, निशा गावंडे, प्रा,अनिल ठाकरे, अनिल डाहेलकर, मिलिंद इंगळे, उपस्थित होते. यावेळी प्राचार्य गजानन बोचरे यांचा शिक्षक परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव विष्णू लोडम यांना सामाजिक कार्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रा. डॉ. संतोष ठाकरे व जेष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून स्पर्धेत इयत्ता तीसरी ते पदवीपर्यंतच्या,
तसेच शिक्षक व पालक मिळूण १३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रियंका गावंडे, सुजाता तायडे, चंचल काळेकर या अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यत आले. प्रोत्साहनपर बक्षीस अद्धा ठाकरे, पार्शनी मुळे, भार्गवी कोकणे, दानवी दानवे, लोचनी बोंबटकर, गौरी गेंद, ऋतुजा उमाले, मयुरी वानखडे, आचल वानखडे यांना देण्यात आले.
श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूरचे वैभव असून आंतरभारती परिवाराच्या वतीने केलेला सत्कार कायम स्मरणात राहून सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा देत राहील असे भावनिक उद्गार आपल्या सत्काराला उत्तर देताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विष्णू लोडम यांनी काढले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आंतरभारती परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले .