Monday, December 23, 2024
Homeखेळनैनगुडा येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक आत्राम यांच्या...

नैनगुडा येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण…

जय सेवा क्लब क्रीडा मंडळाकडून ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन

गडचिरोली – एटापल्ली तालुक्यातील नैनगुडा येथे जय सेवा क्रीडा मंडळाकडून ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून ठेवण्यात आले होते.विजयी संघांना पुरस्कार माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते देण्यात आले.

याबक्षीस वितरणाच्या वेळी माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,उपसरपंच कोटमी महादेव पदा,आविस एटापल्ली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आविस एटापल्ली तालुका सचिव नानेश गावडे,आविस जेष्ठ सल्लागार शंकरजी दासरवार, आविस जेष्ठ सल्लागार अडवेजी कांदो,माजी सरपंच सुनील मडावी,माजी उपसभापती नितेश नरोटे,नरेश सरकार कोटमी,जुलेख शेख,विनोद कावेरी,राकेश बोलमपल्लीवार,गाव भूमिया सनकु कोल्हा,पोलीस पाटील बंडू कोल्हा,मुख्याध्यापक चापले सर,अर्चना मडावी,नरेश पल्लो,महादू पल्लो,विलास कोल्हा,महादू कोल्हा,मुनेश गोटा,रमेश कोल्हा,करण कोवसे,संजू कोल्हा सह गावकरी व आविस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: