Friday, November 15, 2024
Homeराज्यकवलापूर विमानतळासाठी तत्वता मंजुरी...आमदार सुधीर गाडगीळ

कवलापूर विमानतळासाठी तत्वता मंजुरी…आमदार सुधीर गाडगीळ

सांगली – ज्योती मोरे.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्यासोबत आज कवलापूर विमानतळाबाबत झालेल्या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे गेली साठ वर्षे सांगलीकरांचे कवलापूर विमानतळाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. मुंबईत आज उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत कवलापूर विमानतळा संदर्भात बैठक झाली.

या बैठकीसाठी खानापूर आटपाडीचे आमदार अनिलभाऊ बाबर बैठकीस उपस्थित होते. तर सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी या बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे कवलापूर येथे विमानतळ व्हावे यासाठी सांगलीच्या जनतेची मागणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर विमानतळासाठी सांगलीतील विविध संघटना प्रयत्न करत होत्या. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनीही केंद्रीय हवाई मंत्री ना. ज्योतिरादित्य शिंदे, रस्ते वाहतूक महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कवलापूरला विमानतळ व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता.

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेही कवलापूरला विमानतळ व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. या बैठकीमध्ये कवलापूर विमानतळाच्या बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये कवलापूर येथे विमानतळ होण्याकरता तत्वतः मंजुरी दिली असून लागणाऱ्या भूसंपादनाच्या जमिनीबाबत ही लवकर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी कवलापूर विमानतळाची सांगली जिल्ह्यासाठी असलेली गरज या बैठकीत मांडली. सांगलीच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषी पूरक उद्योगांच्या विकासासाठी कवलापूर येथे विमानतळ होणे गरजेचे आहे. सांगलीकरांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे.

एम.आय.डी.सी. कडील असणारी जमीन विमानतळ विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून यापुढील सर्व कारवाई विमानतळ विभागाचे अधिकारी पूर्ण करणार आहेत असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

तसेच आमदार सुधीर गाडगीळ व अनिल बाबर यांनी कवलापूर विमानतळाची मागणी मान्य केल्याबद्दल उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचे आभार मानले त्याचबरोबर सांगलीकरांचे कवलापूर विमानतळाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: