Monday, December 23, 2024
Homeव्यापारमालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने मुख्याध्यापकाचे कार्यालय सिल...

मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने मुख्याध्यापकाचे कार्यालय सिल…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड -वाघाळा महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी पदभार घेतल्यापासून मनपा कडून धडक कारवाई करण्यात येत असल्याने अनेकांचे धाबे दनाणले आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना थकीत कर वसुली वाढवण्याच्या सूचना बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चार वजीराबाद अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण संस्था भारत विद्यालय, शक्ती नगर नांदेड यांच्याकडे मार्च 2024 पर्यंत थकबाकीसह 17 लक्ष 5 हजार 877/ रुपये येणे बाकी होते.

सदरील संस्थेने सन 2012 मध्ये नियमित दिवाणी दावा क्रमांक 718 /2012 महानगरपालिके विरुद्ध दाखल केलेला आहे. त्या दाव्यामध्ये सदरील संस्थेने मागणी बिल दिनांक 5 जानेवारी 2012 नुसार रुपये 43 हजार 371/ ला अवाहान दिले आहे. बाकी रक्कमेस कोणतेही अवाहान दिले नाही.

संबंधित सस्थेंकडे थकबाकीसह कर भरण्यासाठी दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी पत्र पाठविले असता त्यांनी नकार दिल्यामुळे दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी सदर जागेच्या दर्शनी भागावर मागणी बिल व कार्यालयीन पत्र डकविण्यात आले व पंचनामा करण्यात आला. संबंधित राष्ट्रीय शिक्षण संस्था भारत विद्यालय, शक्ती नगर नांदेड यांच्याकडे मार्च 2024 पर्यंत थकबाकी सह रु. 17 लक्ष 5 हजार 877/ येणे बाकी होते.

त्यांनी थकबाकी सह कर न भरण्या केल्यामुळे मुख्याध्यापक यांचे कार्यालय दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चार वजीराबाद यांनी सील केले आहे व त्यांना नमुना आय नोटीस देण्यात आली आहे.

सदर कारवाई आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त गिरीश कदम, उपायुक्त( कर) डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव,गिरीश काठीकर अजहर अली ,गौतम कवडे ,रजनीकांत सुनेवाड, कपिल लाठकर ,जाकीर अली यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

थकित मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या कराचा भरणा करून जप्ती टाळावी व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: