Monday, November 18, 2024
Homeराज्यपंतप्रधान रोजगार निर्मित कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम राबविण्यासाठी कोणीही एजंट...

पंतप्रधान रोजगार निर्मित कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम राबविण्यासाठी कोणीही एजंट नाही; कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन…

अमरावती – दुर्वास रोकडे

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम व केंद्र शासनाची पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रम हे शासनाचे महत्‍त्वकांक्षी योजना आहे. या योजनाची अंमलबजावणी जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत केली जाते. सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना उद्योग, सेवा उद्योग उभारण्याकरीता ही योजना राबविण्यात येत.

सदर योजना राबविण्याकरीता गाव माझा उद्योग फांउडेशन, नागपूर, तसेच कोणतीही खाजगी व्यक्ती, एनजीओ, सहकारी सोसायटी, बचतगट, किंवा इत्‍तर कुठलीही संस्थांची नेमणूक करण्यात आलेली नाही. सदर योजना मोफत असून याकरीता कुठलीही फी आकारण्यात येत नाही. या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

त्यामुळे कुठल्याही संस्थेसोबत संपर्क साधू नये. आपली फसवणूक होऊ शकते. सदर योजनेची परिपुर्ण माहिती घेण्याकरीता कार्यालयीन वेळेत येवून माहिती प्राप्त करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: