Monday, December 23, 2024
Homeराज्यसांगली विधानसभा मध्ये १०१ ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या १०० व्या मन की...

सांगली विधानसभा मध्ये १०१ ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या १०० व्या मन की बात प्रसारण…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या मन की बात कार्यक्रमाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद – आमदार सुधीर दादा गाडगीळ

सांगली – ज्योती मोरे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या मन की बात प्रसारनाचा सांगलीत भाजपा नेते कार्यकर्त्यांनी लाभ घेतला. सांगलीतील कच्छी भवन मध्ये आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, प्रदेश सचिव पै. पृथ्वीराज पवार संघटक सरचिटणीस दीपक माने, स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच सांगली विधानसभेमधील 100 बूथ वर हा मन की बात हा कार्यक्रम बूथ प्रमुख व नगरसेवकांनी घेण्यात आला आजच्या 100 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण, आरोग्य, आधुनिकीकरण आणि महिला सक्षमीकरण या विषयावर जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सर्व मंडल विभागाने केले होते. कार्यक्रमास भाजपाचे स्थानिक नेते पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी समोरील एल.ई.डी. स्क्रीनद्वारे उपस्थित भाजपा प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी मोदींच्या मन की बातचा लाभ घेतला. या कार्यक्रमास नगरसेवक संजय कुलकर्णी, जगन्नाथ ठोकळे, रणजीतसिह सावर्डेकर, नागरसेविका सुनंदाताई राऊत,अनारकली कुरणे, गीतांजली ढोपे पाटील, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, जेष्ठ नेते श्रीकांत शिंदे, महादेव ढोपे पाटील, अमर पडळकर, राहुल ढोपे पाटील, गणपती साळुंखे, शशिकांत टेके, श्रीकांत वाघमोडे, दरिबा बंडगर,

श्रीकांत वाघमोडे, सुजित राऊत, रमेश साबळे, सुरज पवार, शुभम कुलकर्णी, गीता पवार, माधुरी वसगडेकर, अरुणा बाबर, शिवांगी म्हैसाळकर, हेमलता मोरे, रेखा पाटील, अर्चना पाटील, स्वप्नीला नवलाई, शिवराज बोळाज, राहुल ढोपे पाटील, पृथ्वीराज पाटील, भीमराव नवलाई, मकरंद मामुलकर, उदय मुळे,

अभिमन्यू कांबळे, रमेश साबळे, रवींद्र वादवणे, संभाजी सरगर, योगेश चिवटे, शैलेश पवार, गौस पठाण, बाळासाहेब बेलवलकर, राजेंद्र कार्लेकर, आनंदा चिकोडे, विकास आवळे, अमित गडदे, राजू मद्रासी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, आभार सरचिटणीस अविनाश मोहिते यांनी मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: