Friday, October 18, 2024
Homeराज्यबिरसी विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व खासदार प्रफुलभाई पटेल यांच्यात राजकीय चर्चेसह...

बिरसी विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व खासदार प्रफुलभाई पटेल यांच्यात राजकीय चर्चेसह सह जिल्ह्याच्या विकासाला गति मिळेल आदि विषयांवर चर्चा…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

( गोंदिया ) लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुका होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रविवारी (दि.५) मध्यप्रदेशातील शिवणी येथे प्रचार सभेला जाण्याकरिता आले होते. प्रचार सभेला जाण्यासाठी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी खासदार प्रफुल पटेल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि खासदार प्रफुलभाई पटेल यांच्यात राजकीय चर्चा झाली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बिरसी विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार प्रफुल पटेल यांनी पुष्पगुच्छ देवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चे स्वागत केले. यादरम्यान प्रधानमंत्री मोदी आणि खासदार प्रफुलभाई पटेल यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत खासदार प्रफुलभाई पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विकास कामे, बिरसी विमानतळावरुन १ डिसेंबरपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा प्रारंभ होत आहे.भविष्यात या विमानतळावरुन कार्गो सेवा सुरु झाल्यास तांदूळ व अन्य कृषी मालाची निर्यात करण्यास मदत होईल. शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होवून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल आदी विषयावर चर्चा केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: