Sunday, December 22, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींची डिग्री नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लटकवा...संजय राऊत...

पंतप्रधान मोदींची डिग्री नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लटकवा…संजय राऊत याचं डिवचणार ट्वीट

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकाराखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री नेमकी काय आहे, ती सार्वजनिक करा, अशी मागणी केल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून Twitter वर ‘डिग्री दिखावो’ हे ट्रेंड करीत असून यावर कॉंग्रेसने कोणतेही कसर सोडली नाही, सोबतच सोशल मिडीयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अजूनही सुरूच आहेत. तर आज संजय राऊत यांनीदेखील पंतप्रधानांना डिवचणारे ट्विट केले आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये एका डिग्रीचा फोटो शेअर केलाय. ही डिग्री संसदभवनाच्या मेनगेटवर टांगा, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.

गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर आता विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे. देशाच्या पंतप्रधानांना आपली डिग्री दाखवण्याची लाज का वाटावी, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगर येथील सभेत हाच मुद्दा उचलून धरला होता.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका डिग्रीचा फोटो ट्विट केलाय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असून एंटायर पॉलिटिकल सायन्स असं विषयाचं नाव लिहिलंय. डिग्रीचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यावरून राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘ आपल्या पंतप्रधान मोदी यांची ही डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतायत. पण मी म्हणतो- ‘Entire Political Science’ या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे. नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर ही फ्रेम करून लटकवली पाहिजे. यामुळे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत…..

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: