नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड शहरात व जिल्ह्यात यावर्षी दिनांक 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश स्थापना झाली असून दिनांक 28 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन व ईद मिलाद हे सण साजरे करण्यात येणार आहेत. सण-उत्सव शांततेत पार पाडणे करीता नांदेड पोलीस विभागाकडून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये 333 ईसमांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
यात उप विभाग निहाय करण्यात आलेल्या र्कावाहीची संख्या, उप विभाग नांदेड शहर 54, उप विभाग इतवारा 49, उप विभाग नांदेड ग्रामीण 6, उप विभाग कंधार 18, उप विभाग देगलुर 19, उप विभाग बिलोली 29, उप विभाग धर्माबाद 59, उप विभाग भोकर 39, उप विभाग किनवट 25, उप विभाग माहुर 35 असे एकुण 333 इसमावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.