Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingचक्क! गाईला बाईकवर बसवून घेवून चालला...व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल...

चक्क! गाईला बाईकवर बसवून घेवून चालला…व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल…

न्युज डेस्क – सोशल मीडियावर एक विचित्र आणि मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती बाईकवर आरामात गायीला बसवून घेवून जाताना दिसत आहे. आत्तापर्यंत तुम्ही फक्त शेळ्या, कुत्रे किंवा मांजर बाईकवरून फिरताना पाहिले असतील. कारण हे लहान प्राणी आहेत, त्यांना कुठेतरी नेणे कठीण नाही. पण या माणसाने कमाल केली आहे. तो गायीसोबत दुचाकीवर बसला. गायीच्या पाठीवर बसून असे स्वार होणे धोकादायक असले तरी तो मात्र आरमात गाडी चालवत आहे.

व्हायरल क्लिप X वर (@Madan_Chikna) नावाच्या खात्याद्वारे पोस्ट केली गेली आहे. अवघ्या 12 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने आपल्या बाईकच्या पुढच्या सीटवर गायीला बसवल्याचे दिसून येते. तो स्वतः मागे बसलेला असताना. इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रवासात गायीने आपल्या मालकाला अजिबात त्रास दिला नाही. तिच्या मालकाने तिला ज्या स्थितीत बसवले होते त्याच स्थितीत ती बाईकवर शांतपणे बसून राहिली.

11 नोव्हेंबर रोजी शेअर केलेल्या या क्लिपला 7 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले- मी विचार करत आहे की बाईकवर बसण्यासाठी गाय कशी चढली असणार. दुसरा म्हणाला- गाय खूप शांत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: