सांगली – ज्योती मोरे
लायन्स क्लब ऑफ जत च्या अध्यक्ष पदी लायन श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल जत यांची निवड करण्यात आली. ला.सुभाष शिंदे यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कार्य केले आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक संघटनेत विविध पदावर कार्यरत आहेत.त्यांना जिल्हा, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
भव्य कार्यक्रमात पदग्रहण व शपथविधी समारंभ सोहळा,-२०२३/२०२४ स्थळ: उमा नर्सिंग कॉलेज लाॅन,जत येथे सोमवार,दि.१७जुलै २०२३ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला लायन्स च्या नियमाप्रमाणे घंटानाद व प्रास्तविक जत लायन्स क्लब संस्थापक अध्यक्ष मा.ला.डॉ.रवींद्र आरळी यांनी केले.
समारंभाचे प्रमुख पाहुणे मा.ला.डाॅ.विरेंद्र चिखले,(उप प्रांतपाल- २),मा.यांनी नूतन अध्यक्ष व पदाधिकारी यांना या वर्षीचे कामकाज व जबाबदाऱ्या याविषयी माहिती देऊन त्या त्या पदांचा शपथविधी घेणेतआला. यावर्षी चे नूतन सदस्य श्री.अमोल जोशी सर व श्री.राजेंद्र दुगानी सर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
मा.ला.दिनकर पतंगे, (G.A.T.Co- ऑर्डीनेटर रिजन -3),व नूतन अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी,मा.ला.शांतीलाल ओसवाल(झोनअध्यक्ष) ला.सौ.रेणुका आरळीमॅडम, ला.राजेंद्र आरळी, ला.विश्वेश जोशी, ला.विद्याधर किटद सर,ला.दीपक हत्ती, ला.ऍड.म्हमाणेसाहेब, ला.बसनिंग माळी सर व इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला गायक ला.राजेंद्र आरळी व गायक ला.सहदेव माळी सर यांनी हिंदी-मराठी गीते सादर करून सर्वांची मने जिंकली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ला.सहदेव माळी सर यांनी केले शेवटी ला.दिनकर पतंगे यांच्या आभारप्रदर्शनानंतर कार्यक्रमा ची सांगता करणेत आली.