Saturday, September 7, 2024
spot_img
HomeMarathi News Todayअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई केंद्रातून नाशिक शाखेची ‘अ डील’ एकांकिका सर्वोत्कृष्ट..!

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १० ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा येथे पार पडली. नाट्य परिषदेच्या सर्व शाखांसाठी हा उपक्रम गेल्या १३ वर्षांपासून सुरू आहे. मागील ४ वर्षांपासून हा उपक्रम बंद करण्यात आला होता.

परंतु नवनिर्वाचित कार्यकारी समितीने या स्पर्धा पुन्हा सुरू केल्या आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी प्राथमिक फेऱ्या संपन्न झाल्या आहेत. मुंबई येथील प्राथमिक फेरी उदघाटन प्रसंगी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब भोईर,

जेष्ठ अभिनेत्री व कार्यकारी समिती सदस्या श्रीमती सविता मालपेकर, कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, सहकार्यवाह श्री. दिलीप कोरके, बालरंगभूमीचे असिफ अन्सारी, परीक्षक श्रीमती रुपाली मोरे, श्री. अनंत जोशी, स्पर्धा प्रमुख श्री. शिवाजी शिंदे, श्री. दिगंबर आगाशे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ५ एकांकिका सादर झाल्या.

बोरिवली शाखेने “सुरकुत्या”, कल्याण शाखेने “चफी”, नाशिक शाखा – “अ डील”, मुलुंड शाखा “नमस्कारासन” तर मुंबई मध्यवर्तीने “द स्टोरी ऑफ हिस् वर्ल्ड” ही एकांकिका सादर केली.

स्पर्धेत वेगवेगळ्या विषयांवर एकांकिका सादर करण्यात आल्या. या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नाशिक शाखेची ‘अ डील’ ही एकांकिका सर्वोकृष्ट ठरली, तर मध्यवर्तीची ‘द स्टोरी ऑफ हिस वर्ल्ड’ ही एकांकिका उत्कृष्ट ठरली, आनंद जाधव यांना दिग्दर्शनाकरिता सर्वोत्कृष्ट तर सागर सातपुते यांना उत्कृष्ट पारितोषिक देण्यात आले.

पूजा पुरकर, मानसी जाधव, हेमाली साळवे, स्नेहल काळे, करुणा कातखडे, विश्वंभर परेवाल, संकेत खंडागळे, कुणाल गायकवाड, नंदकिशोर भिंगारदिवे यांना अभिनयाची प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धा प्रमुख श्री. शिवाजी शिंदे, कार्यालयीन कर्मचारी सचिन गुंजोटीकर, राहुल पवार, विशाल सदाफुले, व कार्यकर्ते श्री. गणेश तळेकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: