- 430 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग.
- गावातील सर्वच शाळेने घेतला सहभाग.
- एस. आर.के इंडो पब्लिक स्कूल चा अभिनव उपक्रम.
नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील एस आर.के.इंडो पब्लिक स्कूल च्या वतीने सोमवारला सामान ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जलाल खेडा येथील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला असून एकूण 430 विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना लहान पणापासून स्पर्धा परीक्षे बाबत माहिती मिळावी. लहान पणापासून त्यांची तयारी करून घेणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना जर स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर लहापणापासूनच पूर्व तयारी करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. दरवर्षी शाळेच्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत माहिती मिळावी या दृष्टीकोनातून या परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे.
त्याच प्रमाणे दरवर्षी विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केल्या जाणार असून यासाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या अधिकाऱ्याला यासाठी बोलावरणार असण्याचे प्राचार्य यांनी सांगितले.घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी प्रतेक शाळेतील दोन शिक्षकांना बोलावण्यात आले होते. शाळेच्या पटांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून दीक्षा पावडे, सरिता तिवारी, चेतन भाकरे, कविता कळंबे, चित्रा ढोकणे, जगदीश माळोदे, नीलिमा इंगोले, शकिला शेख, अश्विनी रेवतकर, उमेश रेवतकर, रक्षा शुक्ला उपस्थीत होते. ही परीक्षा प्राचार्य शुभांगी अर्डक यांच्या मार्गदरशनाखाली व प्रशांत येवले यांच्या प्रयत्नातून घेण्यात आली.